राजकीयसामाजिक

मशाल, पेटणार कि, धनुष्यातील बाण सुटणार ? कि वादळातील संघर्ष दिवा लावणार ? मतदारसंघातील हवा काय ?

सरूड प्रतिनिधी :( उज्वला कोकणे यांजकडून )

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शौर्य कुणाचे याची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना, सत्यजित पाटील सरुडकर महायुतीचा वारू रोखणार का? हे निकाल नंतर स्पष्ट होईल . महा विकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचेकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात असले तरी खासदार धैर्यशील माने यांनीही विजयाचा हुंकार टाकला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी संघर्षातून निर्माण केलेले आपले अस्तित्व यालादेखील दुर्लक्षित करून चालणार नाही.


खासदार धेर्यशील माने यांनी मतदार संघात शेवटच्या टप्प्यात जादुची कांडी फिरवल्याने विजयाकडे वाटचाल त्यांची होणार का ? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.. निवडणुका जाहीर झाल्या नंतर खासदार माने व शेटटी यांच्यात पारंपारिक लढत होईल असे वाटत असताना, उद्धव ठाकरे यांनी मास्टर स्ट्रोक मारून सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने निवडणूकीचे वारेच फिरले.
उमेदवारी जाहीर झाल्या पासून मतदाना पर्यंत तयार झालेली हवा , मतदारांच्या बोलक्या प्रतिक्रिया, पडद्याआडच्या घडामोडी , आमिषांचा पाऊस, लोकांनी हाती घेतलेली निवडणूक, सहानुभूतीची लाट, निष्ठावंत विरोध गद्दार, जातीचे समीकरणे आदी कारणांमुळे ही निवडणूक गाजली आहे.


या मतदारसंघात एकूण मतदार १८४ ४२७७ पैकी १२९० o ७३ इतके मतदान झाले .त्यापैकी शाहूवाडीतदोन लाख 95 हजार 347 पैकी दोन लाख पंधरा हजार तीनशे 68हातकणंगले तीन लाख 31 हजार 681 पैकी दोन लाख 49 हजार 820 मध्ये इचलकरंजी मध्ये तीन लाख एक हजार एकशे वीस पैकी दोन लाख पाच हजार एकशे नव्वद शिरोळमध्ये मध्ये तीन लाख 17 हजार 490 पैकी दोन लाख 33 हजार 665 इस्लामपूर मध्ये दोन लाख एक्कात्तरहजार 425 पैकी एक लाख 85 हजार 727 शिराळा दोन लाख 97 हजार 221 पैकी दोन लाख 307 इतके मतदान झाले.


महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या मागे भाजपची टीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्तअसल्यामुळे मनी, मसल्ल आणि पॉवर वापरून मतदारसंघात त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवले. खासदार माने यांच्या प्रचारासाठी दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशीउतरली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी ही तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्रजी पवार, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघात सभांचा धमाका उडवून दिला. स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात बच्चू कडू यांनी सभा घेतल्या . शेतकऱ्यातील सहानुभूती, चळवळीचा नेता म्हणून लोक आपल्याला पुन्हा संधी देतील असा ठाम विश्वास असल्याने त्यांनी महाविकास आघाडी पासून बाजूला होऊन स्वाभिमान ठेवत ” एकला चलो ” चा नारा दिला .


मतदार संघ निहाय्य विचार केला तर शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातून मागील निवडणुकीत धैयशील माने यांना मताधिक्य मिळाले होते, परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीचे स्थानिक उमेदवार जाहीर केल्याने या मतदारसंघात राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने, मतदार संघात चैतन्य निर्माण झाले .माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्यानंतर 25 वर्षांनी तालुक्याला संधी मिळाल्याने गटातटाच्या पलीकडे जाऊन महा विकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यातआपली मते पडतील, अशी अपेक्षा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहेत.
उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या सहनभूतीची लाट येथे प्रचंड पाहायला मिळते.
शाहुवाडी पन्हाळा तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. विनय रावजी कोरे यांनी धैर्यशील माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने, त्यांनी या मतदारसंघात आपली फिल्डिंग टाईट केली गोकुळचे संचालक कर्णसिंह सिंह गायकवाड व सर्जेराव पाटील पेरिडकर यांना सोबत घेऊन गावागावात दौरे करून आपली प्रचार यंत्रणा गतिमान केली . पेरिडकर यांनी तर सत्यजित पाटील यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केल्याने शाहूवाडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे . मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तालुका तालुक्यामध्ये वेगळ्याच गोष्टी घडल्या .
कार्यकर्त्यावर दबावाचा प्रभाव टाकला गेला त्यामुळे गावागावात असणारे कार्यकर्ते रिचार्ज झाले, परंतु स्थानिक पातळीवरील उमेदवार असल्याने सहानुभूती आणि 40 वर्षानंतर तालुक्याला संधी प्राप्त झाल्याने गट बाजूला ठेवून ‘ आमचं ठरलंय ‘म्हणत मशाल पेटवत ठेवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सत्यजित पाटलांसाठी स्वतः धर्म संकटात सापडलेले जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांनी पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढला आहे..

वाळवा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समज.ला जातो . या मतदार संघावरच महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा कस लागणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून कार्यकर्त्यांना कामाला लावले .या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद मोठी आहे त्यामुळे राजू शेट्टींना या मतदारसंघात बळ मिळेल महायुतीचे उमेदवार धेयशील माने यांनी आपली प्रचार यंत्रणा गतिमान केली खरी, परंतु कमी संपर्क ठेवल्याने त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे जाणवते. परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी केले ली किमिया यशस्वी होते का ? हे लवकरच समजेल. या ठिकाणी महायुतीचे स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला नसल्याने व भविष्यात आपणाला अडचण होऊ नये म्हणून आपली मते वळवण्यात आली
शिराळा मतदार संघाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिल्याने, सहाजिकच येथे सत्यजित पाटलांचे पारडे जड होईल . त्यांचे वडील विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून गेली तीस पस्तीस वर्षे काम करीत आहेत. त्यामुळे या मतदार संघात कारखान्याच्या माध्यमातून वावर आहे . या मतदार संघातील लिड हीच विजयाची नांदी ठरेल . राजू शेट्टींनाही या मतदार संघात मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे. कारण हा भाग ऊसाचा पट्टा आहे, म्हणून ओळखला जातो . महायुतीचे उमेदवार धैयशील माने यांच्या विजयासाठी सत्यजित देशमुख , राहूल महाडीक, सम्राट महाडीक यांनी प्रयत्न केले. परंतू धैर्यशील माने यांच्या कार्य पद्धतीवर व संपर्क नसल्याने मतदारसंघामध्ये रोष दिसून आला . शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी केलेली धडपड यशस्वी झाली, तरच त्यांना आघाडी मिळेल.

एकंदरीत शाहुवाडी ची मशाल, पेटणार कि, धनुष्यातील बाण सुटणार ? कि वादळातील संघर्ष दिवा लावणार ? हे कालच ठरवेल .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!