महाशिवरात्री निमित्त बांबवडे इथं प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय च्या वतीने अवतरताहेत बारा ज्योतिर्लिंग
बांबवडे: बांबवडे तालुका शाहुवाडी इथं मलकापूर रोड जवळ प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय शाखा बांबवडे यांच्यावतीने महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंग देखाव्याच्या रुपात अवतरत आहेत.
हा शंभू महादेवाचा सोहळा २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांसाठी सुरु राहणार आहे. अशी माहिती शाखेच्या वतीने संगीता बहेनजी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली आहे.
यावेळी या सोहळ्याविषयी बोलताना बहेनजी पुढे म्हणाल्या कि, प्रती वर्षाप्रमाणे यावेळी देखील शंभू महादेवाचा महाशिवरात्री सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी मात्र याठिकाणी फार मोठा देखावा संपन्न होणार आहे. इथं १०० फुटी गुंफा तयार करण्यात येणार आहे. इथं निसर्गाचे रूप देखील दाखवत असताना १२ फुटांवरून धबधबा कोसळताना भाविकांना पहावयास मिळणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपल्याला होणार आहे. त्यामुळे भाविकांनी या देखाव्यास जरूर भेट द्यावी. असे आवाहन संगीता बहेनजी यांनी केले आहे.
या देखाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, गावचे सरपंच श्री भगतसिंग चौगुले, उपसरपंच श्री सुरेश नारकर , यांच्यासहित अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय शाखा इस्लामपूर च्या शोभा बहेनजी आणि सर्वच बांबवडे शाखेचे अनुयायी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.