यश फोटो चे मालक मुरलीधर पाटील यांचे आकस्मिक निधन
सरूड : यश फोटो स्टुडीओ सरूड चे मालक मुरलीधर पाटील यांचे काल दि.५ जुलै २०२५ रोजी रात्री आठ वाजनेच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले. मुरलीधर पाटील हे मुळचे राहणारे नाटोली तालुका शिराळा जि.सांगली येथील आहे. ते अतिशय मनमिळावू आणि मेहनती व्यक्तिमत्व होते. अशा स्व. मुरलीधर पाटील यांना आमच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ,असे त्यांचे मित्र संपत आनंदा पाटील राहणार शिंपे तालुका शाहुवाडी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
मुरलीधर पाटील यांचे उद्या दि.७ जुलै २०२५ रोजी रक्षाविसर्जन सकाळी ९.०० वा. नाटोली इथं आहे.