लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामांदीर मध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
शिराळा प्रतिनिधी : गुरुवार दि.१५ जून रोजी शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामांदीर मध्ये विद्यार्थ्यांचे पुस्तके वाटप करून, गोड खाऊ देवून स्वागत केले.

यावेळी एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार,पत्रकार दशरथ खुटाळे यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

यावेळी मुकुंद पवार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक धनराज गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कांबळे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खबाले सर यांनी केले. आभार संग्राम पाटील सर यांनी मानले.
यावेळी पालक, विद्यार्थी यांच्यासमवेत शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.