विविध विकास कामांसाठी २६ कोटी मंजूर – श्री सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी :-
शिराळा विधानसभा मतदारसंघातील दोन मोठे पूल व रस्ते या कामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पा मधून सुमारे 26 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. अशी माहिती भाजप नेते, सांगली जिल्हा मध्य.बँक संचालक मा सत्यजित देशमुख यांनी दिली.

यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले कि, शिराळा विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागातील विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री सुरेश खाडे, यांच्या सहकार्याने 26 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

कोकरूड ते रेठरे तालुका शाहुवाडी, वारणा नदी वरील दोन जिल्ह्यांना जोडणारा मोठ्या पुलाची मागणी सातत्याने लोकांमधून होत होती. या ठिकाणी लहान पूल असल्याने जड वाहतूक होत नव्हती, व पावसाळ्यामध्ये वाहतूक बंद होत होती. या पुलाच्या कामासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाले आहेत.

शिराळा कदमवाडी,उपवळे मोरणा नदीवर मोठा पूल, या कामासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. दोन्हीही पूल बांधावेत, असे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आज होत आहे. वाळवा तालुक्यातील जिल्हा हद्दी पासून कासेगाव, येवलेवाडी, धनगर वाडा रस्ता प्रतिमा-126 सुधारणा करणे. याकामी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. अशा पूल व रस्ते कामांसाठी 26 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली..