शासनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा-शिराळा बिडीओ श्री राउत
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर) : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे शेतकर्यांच्यासाठी मोठे योगदान आहे. शासनामार्फत शेतकऱ्यांच्या साठी विविध योजना राबविण्यात येत आहेत यातून कृषी विकास होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे प्रतिपादन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले.शेतकरी गट व महिला बचत गट यांच्यामार्फत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा असे आवाहन ही त्यांनी केले.
येथील पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग शिराळा यांच्या वतीने कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून कृषिदिन साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी मिरज जी. एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पाटील यांनी आपला डोंगरी तालुका आहे फळबाग लागवड करणे आवश्यक आहे यातून पर्यावरण संरक्षण होईल असे सांगून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक आबासाहेब कुंभार यांनी पर्यावरण समतोल साठी वृक्ष लागवड याविषयावर मार्गदर्शन केले.
विस्तार अधिकारी बी जी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नॅनो युरिया वापर याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार , महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सतीश नवले ,कृषी अधिकारी सुभाष घागरे , मंडळ कृषी अधिकारी निलेश अडसुळे नानासो कारंडे ,राजेंद्र दशवंत , विजय पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अजिंक्य कुंभार यांनी आभार मानले.