१४ वर्षांच्या तपश्चर्येने ” यशराज ऑप्टीकल्स ” चे पंधराव्या वर्षात पदार्पण : ” यशराज ऑप्टीकल्स ” चा आज वर्धापनदिन
बांबवडे : गेल्या १४ वर्षांच्या तपश्चर्येने आज खऱ्या अर्थाने आपला उद्योग शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे नगरीत नावारूपाला आला आहे. यासाठी कष्ट, चिकाटी , आणि प्रामाणिकपणा या त्रिवेणी संगमाच्या एकरूपते मुळे व्यवसाय चढता आलेख गाठत आहे. हि वास्तविकता आहे, येथील ” यशराज ऑप्टीकल्स ” या चष्म्याच्या दुकानाची आहे. बांबवडे तालुका शाहुवाडी इथं येवून आज च्या दिवशीत्यांना चौदा वर्षे पूर्ण होत आहे. आणि यशाच्या पंधराव्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत.

त्यांच्या आजच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

ओंकार कदमबांडे व मयूर कदमबांडे या बंधूंनी गेली १४ वर्षे स्वकष्टाने या व्यवसायात जीव ओतला. आबालवृद्ध मंडळींची माफक दरात सेवा केली. त्याचबरोबर चाष्म्यांची गुणवत्ता देखील जपली. अवास्तव दर न लावता माफक दरात चष्मे दिले. त्याचबरोबर जापनीज टेक्नॉलॉजी चा वापर करून गरजवंतांचे डोळे तपासले. आपल्या कौशल्यपूर्ण अभ्यासाने योग्य निदान करून आबालवृद्धांची दृष्टी सांभाळली.

तरुण, कॉलेज वयीन विद्यार्थ्यांना फॅशनेबल गॉगल्स मिळण्याचे हे एकमेव ठिकाण ठरले आहे. गॉगल्स च्या डिझाईन मध्ये विविधता देत ब्रँड ग्रामीण भागातील तरुण मंडळींना दाखवून दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने फॅशनेबल जगाचे ज्ञान तरुणांना करून दिले.

यशराज ऑप्टीकल्स ने गेल्या १४ वर्षात आभाळा एवढी उंची गाठली आहे. या ओंकार व मयूर कदमबांडे बंधूंचे खऱ्या अर्थाने पुनश्च अभिनंदन.