अंबीरा ओढ्याचे पात्र बदलण्याचा कोणताही हेतू नाही- आनंदराव पाटील
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा ओढ्यातील बांधकामासंदर्भात आपण कोणत्याही नोटीशी ची पायमल्ली केलेली नसून, सदर च्या नोटिशीला खुलासा करण्यासाठी चे निवेदन तहसीलदार कार्यालय शाहुवाडी यांना देण्यात आले आहे. अशी माहिती ओढ्याच्या पूर्वेकडे जमीन असणाऱ्या आनंदराव पाटील तसेच शैलेश पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

यावेळी आनंदराव पाटील पुढे म्हणाले कि, सदर ची जमीन आमच्या नावे असून, त्या जमिनीची प्रशासकीय मोजणी करण्यात आली आहे. दरम्यान आमच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी होवून, कथित पात्रात आमच्या जमिनीची हद्द आली आहे. तरीही आमचा पात्रात बांधकाम करण्याचा कोणताही हेतू नाही. तसेच ओढ्याचे पात्र बदलण्याचा देखील आमचा कोणताही मनोदय नाही. फक्त आमची जागा असलेल्या जमिनीवरची माती खचून जावू नये, याकरिता आमची पात्रातील हद्द असूनही, हद्दीच्या आत दोन फुट जागा सोडून, फक्त जमिनीच्या पातळीपर्यंत संरक्षक भिंत बांधण्याचा आमचा मनोदय आहे. जेणेकरून ओढ्याच्या पाण्याने आमची जमीन खचू नये. एवढाच आमचा हेतू आहे. यामध्ये डोणोली, अथवा बांबवडे ग्रामस्थांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही.

दरम्यान या ओढ्यावरील पुलाला पाच दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाजे गाळ साचल्याने बंद होण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे उर्वरित तीन दरवाजांवर ओढ्याच्या पाण्याचा दाब येतो, आणि पोटफुगी तयार होते. त्याचा त्रास म्हणजे ओढ्याचे पाणी आसपास पसरते. आणि काही व्यवसाय संकुलात पाणी आल्याने नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून, जर या पात्रातील गाळ काढल्यास तशी परिस्थिती निर्माण होणार नाही. असे आम्हाला वाटते. असेही आनंदराव पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.