सामाजिक

“अक्षय तृतीया ” च्या मुहूर्तावर मोबाईल खरेदीवर ‘दिशा कम्युनिकेशन’ कडून हमखास भेट – श्री शेळके


बांबवडे : येथील दिशा कम्युनिकेशन या मोबाईल शॉपी चे मालक अनिल शेळके यांनी अक्षय तृतीया या सणानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या मोबाईल फोन च्या खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स घोषित केल्या आहेत. तेंव्हा ग्राहकांना ऑफर्स मिळवण्याच्या दृष्टीने मोबाईल फोन खरेदी करावी, असे आवाहन अनिल शेळके यांनी केले आहे.


अक्षय तृतीया हा मराठी सणांच्या अनुषंगाने साडेतीन मुहूर्तापैकी एक सण मानला जातो. यादिवशी अनेक शुभ कामे संपन्न केली जातात. तसेच वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी देखील या दिवशी केली जाते. त्याच अनुषंगाने ह्या ऑफर्स दिशा कम्युनिकेशन च्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर ‘ सॅमसंग A ‘ सिरीज च्या कोणत्याही मोबाईल खरेदीवर लकी ड्रॉ द्वारे वॉशिंग मशीन मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. तसेच ‘ VIVO ‘ चा कोणताही मोबाईल खरेदी केल्यास लकी ड्रॉ द्वारे ३२ इंची एलईडी मिळवता येणार आहे. ‘ OPPO ‘ कंपनी चा ‘ appo ‘ मोबाईल खरेदी केल्यास लकी ड्रॉ द्वारे आपल्याला फ्रीज मिळवण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे.


तसेच realme / Techno / MI oneplus / I Phone या कंपनी चा कोणताही मोबाईल खरेदी केल्यास, लकी ड्रॉ द्वारे वॉटर कुलर, तसेच सिलिंग फॅन आपण मिळवू शकता. तसेच कोणताही मोबाईल खरेदी केल्यास, आपल्याला हमखास काही ना काही गिफ्ट मिळणारच, याची खात्री बाळगा. त्यामुळे येत्या ‘ अक्षय तृतीया ‘ च्या दिवशी मोबाईल फोन खरेदी साठी ” दिशा कम्युनिकेशन ” ला विसरू नका, आणि हमखास काही ना काही भेट आमच्या ग्राहकांना मिळणारच आहे. तेंव्हा ग्राहकांचे स्वागत आहे, असे आवाहन ” दिशा कम्युनिकेशन ” चे मालक अनिल शेळके यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!