अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास सहकार्य करावे – शाहुवाडी पोलिसांचे आवाहन
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : दि. २० मार्च रोजी मानोली धरणानजीक मिळालेल्या महिलेच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. परंतु हा मृतदेह आपल्या कार्यक्षेत्रातील नसून १०० किलोमीटर च्या परिघातील असावा, असा कयास आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून देण्याचे आवाहन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील यांनी केले आहे. दरम्यान ओळख पटवून देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच ओळख पटवून देणाऱ्यास काही बक्षीस हि देण्यात येईल, असे शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी एसपीएस न्यूज च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

दि.२० मार्च रोजी आंबा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मागील बाजूस एका महिलेचा मृतदेह एका पत्र्याच्या पेटीत असल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशीत चौकशी केली आहे. परंतु पंचक्रोशीतून कोणतीही मिसिंग ची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद नाही.

दरम्यान महिला मृतदेहाची ओळख त्यामुळे अद्याप पटलेली नाही. तसेच ओळख न पटल्याने तपासाला गती येण्यास विलंब होत आहे. दरम्यान हि ओळख पटविण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.


सदर च्या मृतदेहाची ओळख पटवून देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, तसेच त्यांचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येईल. त्यामुळे जनतेने हि ओळख पटविणे कामी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने श्री विजय पाटील यांनी केले आहे.