…अथक परिश्रमातून दीप्ती वाघमारे वकील झाल्या
बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील गौतम वाघमारे यांची कन्या कु. दीप्ती गौतम वाघमारे हिने लॉ म्हणजेच वकील च्या अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षात डिस्टींक्शन मध्ये गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन.

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगले गुण मिळवून चांगली पदवी मिळवता येते. हे दीप्ती वाघमारे यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटी च्या बळावर अभ्यास करून, चांगले यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गौतम वाघमारे हे आमचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात शून्यापासून सुरुवात केली होती. आपल्या कष्टाच्या जीवावर त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीनुसार शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. हे त्यांनी आपल्या वर्तनात निर्माण केले. आणि आपल्या मुलांना शिक्षण दिले.

त्याची परिणीती म्हणून आज त्यांची कन्या वकील झाली आहे. पुनश्च दीप्ती वाघमारे यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.