‘ अनिल पाटील ‘ यांची भारतीय मराठा महासंघ कोल्हापुर जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती – हार्दिक अभिनंदन
बांबवडे : गोगवे पैकी तळपवाडी तालुका शाहुवाडी येथील अनिल पाटील यांची भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता पदी निवड झाली आहे.

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. यावेळी श्री अनिल पाटील यांची जिल्हा प्रवक्ता पदी निवड झाली आहे. यावेळी नियुक्तीचे पत्र देताना भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र उप प्रदेश अध्यक्ष श्री सागर पवार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उदयसिंग खोत, सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.

अनिल पाटील हे व्यक्तिमत्व अगदी विद्यार्थी दशेपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या महान व्यक्तीमत्वांवर मनापसून प्रेम करते. यातून च शाहीर असे टोपण नाव त्यांना तालुक्याकडून प्रेमातून मिळाले आहे. भगव्या ध्वजाशी नेहमीच प्रामाणिक राहिलेलं हे व्यक्तिमत्व हिंदुत्वाशी कधीच तडजोड करीत नाही. त्या अनुषंगाने त्यांना मिळालेलं कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता पद , हे त्यांना त्यांच्या कार्याची मिळालेली पोचपावती आहे.

अनिल पाटील यांचे यास्तव साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे मनस्वी अभिनंदन .