अनेक कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश – श्री सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी :-
उपवळे (कदमवाडी) ता. शिराळा येथील गावातील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व दत्त गगनगिरी महाराज मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मा.बजरंग कदम नाना शेठ यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचे स्वागत हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे भाजपा प्रमुख सत्यजित देशमुख यांनी केले.
यावेळी शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष हणमंतराव पाटील विश्वास कारखाना माजी संचालक रणजितसिंह नाईक,जिल्हा परिषद सदस्य के. डी पाटील,सम्राटसिंह शिंदे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- भाजपा पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला मोठी ताकद दिली जाते. या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्ते ला मोठे स्थान आहे. देशाचे नेते नरेंद्र जी मोदी यांनी जनतेचा विश्वास जिंकला असून विकसित भारत चे स्वप्न सत्यात उतरत आहेत. लोकांना सर्व स्तरावर मदत करून प्रत्येकांला स्वयंभू बनविण्याचे काम त्यांच्या हातून सुरु आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसांची मने त्यांनी जिंकली आहेत.
या मतदार संघाच्या विकासासाठी भाजपा पक्षाने विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. लोकांना अपेक्षित असणारी कामे संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. यापुढील काळात संघाटना वाढीसाठी अहोरात्र काम करून संघटन मजबूत करा असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी रणजित नाईक, के. डी. पाटील,सम्राट शिंदे,नाना कदम, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रस्ताविक जगदीश कदम यांनी केले.
यावेळी बाळासो कदम (आप्पा),बाळासो आनंदा कदम,तानाजी नामदेव कदम, अशोक तातोबा कदम,बाळासो नामदेव सावंत,मारुती सदाशिव कदम,शिवाजी दगडू गायकवाड,विशाल रवींद्र कांबळे,स्वयम शानकर वाघमारे,उदयसिंग गायकवाड,महादेव आनंदा कदम. यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सरपंच संभाजी पाटील ,उपसरपंच ऋषिकेश कदम ,सेवा सोसायटी चेअरमन उदय कदम,रणजित कदम,प्रदीप कदम, संजय कदम, प्रदीप पाटील, शंकर कदम, दादा कदम, सूर्यकांत कदम, रणजित पाटील, अशोक इंगवले, मनोज कदम संचालक मंडळ व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.