राजकीयसामाजिक

अन्नदाता शेतकरी बांधवांना राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कार प्रदान


नाशिक : नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते (दुरदृश्य प्रणाली)द्वारे तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यामध्ये २०१७, २०१८, २०१९ या वर्षांमध्ये कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले.


तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये पाच पटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केली आहे. यावेळी कृषिमंत्री दादासो भुसे, छगन भुजबळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!