अमरसिंह भैय्या यांच्या पाठीशी तरुणाईची फौज – संपत पाटील शिंपे
बांबवडे : सरूड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अमरसिंह भैय्या यांच्या पाठीशी तरुणाई ची फौज उभी राहील,याची खात्री आहे. कारण अमर भैय्या हे सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व करतात. हीच काळाची गरज आहे. याची जाणीव तरुणाई ला आहे. असे मत शिंपे तालुका शाहुवाडी येथील हरहुन्नरी व्यक्तिमत्व संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केलं .
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हापरिषद व पंचायत समिती साठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांनी सरूड जिल्हापरिषद मतदारसंघासाठी अमरसिंह हंबीरराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उभे रहात आहेत. त्यांचे चिन्ह मशाल आहे.भविष्यात हि मशाल मतदारसंघातील उर्वरित अविकासाचा अंधार निश्चित दूर करेल. म्हणूनच हि उमेदवारी योग्य असून सर्वच तरुणाई त्यांच्या पाठीशी ठाम आहे. कारण त्याचं कर्तुत्व तसं आहे.
अनेकवेळा तरुणाई च्या अनेक मागण्या त्यांनी स्वखर्चाने पूर्ण केल्या आहेत. अशावेळी जर प्रशासन त्यांच्या सोबत असेल, तर खऱ्या अर्थाने सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्काचा माणूस मिळाला आहे.त्यांनी आपले वडील हंबीरराव पाटील बापू यांच्या पदाचा वापर आपल्या राजकारणासाठी कधी केला नाही.म्हणूनच हे हरहुन्नरी नेतृत्व जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. असेही श्री संपत पाटील यांनी सांगितले.
