अवघा देश ” जय श्रीराम “च्या उद्घोषाने धन्य झाला.
बांबवडे : आज अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा थाटामाटात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. रामंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला विधिवत सुरुवात झाली.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रत्येक व्यक्तीचं प्रेरणा स्थान आहे. अशा प्रभू श्रीरामाचा वनवास आज खऱ्या अर्थाने संपुष्टात आला, असे वाटते. कारण याच ठिकाणी असलेल्या बाबरी मशीद मुळे हे स्थान लुप्त झालं होतं. तेंव्हा हजारो कारसेवकांनी मिळून ह्या मंदीराचं स्थान पुनर्जीवित केलं.
हि गोष्ट सुद्धा विसरता कामा नये. यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. पर्यायाने शिवसेनेचा सहभाग मोलाचा ठरतो. म्हणजेच त्या कार्यात महाराष्ट्राच्या भूमीचा काही न काही सहभाग आहे. या अनुषंगाने महराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण येणं अपेक्षित होतं. परंतु सध्याच्या राजकीय डावपेचांमध्ये ते कदाचित राहून गेलं असेल. असो. हे जरी खरं असलं, तरी याद्वारे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी एक आवाज दिला आणि १९९२ साली घुमट उडवले गेले. आज जर साहेब असते,तर निश्चित ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,मुरलीमनोहर जोशी यांना सोबत घेवून मंचावर गेले असते. असो.
आज श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा कोनशीला समारंभ संपन्न झाला. अवघा देश ” जय श्रीराम ” च्या उद्घोषाने धन्य झाला.