” अविष्कार ” च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी किरण शिंदे सर यांची नियुक्ती
बांबवडे : अविष्कार फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी शिंपे तालुका शाहुवाडी येथील किरण शिंदे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे किरण शिंदे सर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील शिंदे सरांचं हार्दिक अभिनंदन.
अविष्कार फौंडेशन ऑफ इंडिया ( कोल्हापूर- महाराष्ट्र राज्य ) हि संस्था सामाजिक,शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या विस्तार वाढीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र अध्यक्ष संजय पवार (पत्रकार ) यांनी त्यांना दिले आहे.