आंबा घाटात ३०० फुट दरीत स्विफ्ट गेली : एक ठार
बांबवडे : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर विसावा पौईंट जवळ एक स्विफ्ट मोटार गाडी घाटातून ३०० फुट दरीत गेली असून, चालकाचा मृत्यू झाला आहे. सादर घटनेची नोंद साखरपा आउट पोस्ट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी ११ वाजण्यापुवी रत्नागिरी दिशेहून कोल्हापूर दिशेला स्विफ्ट मोटार गाडी क्र.MH-09-D-1099 येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हि गाडी आंबा घाटातील विसावा पौईंट जवळ दरीत ३०० फुट खोल गेली. दरम्यान कोल्हापूर येथील राजारामपुरी येथील संजय जोशी हे गाडी चालवीत होते. त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

अधिक तपास देवरुख पोलीस ठाणे चे साखरपा आउट पोस्ट पोलीस कर्मचारी करीत आहेत.