आंबा येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे,पंटर मुजावर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ) : शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे व त्यांचा पंटर मुबारक मुजावर यांच्यावर लाच मागितले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पंटर मुबारक मुजावर याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाणे इथं नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे वडील मयत झाल्यानंतर वारस हक्क नोंदीसाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मंडल अधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे जावून भेट घेतली. नोंद घातल्यानंतर सांगडे यांनी खाजगी इसम मुबारक मुजावर याला भेटण्यास सांगितले. त्यानुसार भेटले व लाच दिली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून संबंधितास ताब्यात घेतले.

यावेळी केलेल्या कारवाईत राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे पोलीस अधीक्षक सुरज गुरव, आदिनाथ बुधवंत पोलीस उपाधीक्षक, यांच्या मार्गदर्शनानुसार नितीन कुंभार पोलीस निरीक्षक, स. पो.उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो.ना. विकास माने, सुनील घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने, पो.हे.कॉ.सुरज अपराध, विष्णू गुरव, हि पोलीस मंडळी या मोहिमेत सहभागी होती.