आई च्या कष्टातूनच ” संकल्प सिद्धी ” : राजेश यादव यांना मातृशोक
शाहुवाडी प्रतिनिधी : ओकोली तालुका शाहुवाडी येथील आमचे मित्र श्री राजेश श्रीपती यादव यांच्या आई स्व. अनुसयाबाई श्रीपती यादव यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे आज उत्तरकार्य आहे. त्यांच्या आई स्व. अनुसयाबाई यादव यांना चिरशांती लाभो. त्यांच्या पवित्र स्मृतींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

राजेश यादव यांची कर्मभूमी पुणे इथं आहे. त्यांच्या आईंच्या आशीर्वादाने त्यांनी तिथे ल्यांचा चांगला लोकसंग्रह केला आहे. त्यांच्या आईंवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. आईविषयी बोलताना राजेश यादव म्हणतात कि, त्यांच्या आईंनीच त्यांना कष्ट करण्याची सवय लावली. एकेकाळी गोधडी शिवून ज्यांनी आमचा सांभाळ केला, त्यांच्या कष्टातूनच आज ” संकल्प सिद्धी ” सारखं मंगल कार्यालय उभ राहिलं आहे.

आई हि त्यांचा फार मोठा मानसिक आधार होता. शेतात राबणारी अनु आई, हिने रात्रंदिवस शेतात राबून आम्हा भावंडांना शिकवले, म्हणूनच आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या आईमुळेच , असे सांगताना त्यांचा ऊर दाटून आला होता.

” अरे खोप्या मदी खोपा सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला…” कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पंक्ती आमच्या आईंसाठी नितांत सार्थ ठरत आहेत. असेही श्री राजेश यादव यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.