educationalसामाजिक

आई वडील शिक्षकांनी संस्कारक्षम युवक घडवावा _ मा आ . बाबासाहेब पाटील ( सरुडकर )

येळवण जुगाई – ( एस .टी..लष्कर )._ भारत महासत्ता होण्याची चर्चा होत असताना शिक्षणात होणारे नव बदलांचा स्वीकार मातृभाषेवर प्रेम इंग्रजी भाषा अवगत करत विद्यार्थ्यांनी संस्कारांचा विसर पडू देऊ नये जगातील विद्वानांची आत्मचरित्र वाचून भारत देश समजून घ्यावा या .साठी आई वडील शिक्षकांनी संस्कारक्षम नवीपिढी घडवावी असे आव्हान जुगाईहायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाच्या स्थानावरून माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरूडकर यांनी केले ते .पुढे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो घेतो तो गुरगुरल्या शिवाय .राहत नाही . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशातील सर्वसामान्य माणसाला चांगली पदे मिळाली शिक्षणामुळे माणसाचा विकास झाला स्त्री शिक्षणाने देशात क्रांती घडवून आणली देशातील विविध पदे महिला भूषवताना दिसत आहेत प्रत्येकाने थोरांच्या विचारांचे पारायण करावीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी आत्मसात करावे त्यांच्या विचारवरती श्रद्धा ठेवून युवकांनी
वागण्याचा प्रयत्न करावा भारत देशातील महान महापुरुषांचे विचार तरुणांनी वाचावेत तरच देश महासत्ताक होईल जगावरती राज्य करेल अशी आशा व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा श्री . प्रकाश नाईक यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत त्यांचे भविष्य त्यांच्या तळ हाताच्या रेषेवर नसून बुद्धी आणि मनगटात आहे आधुनिकतेचा विचार करता शिक्षणात येऊ घातलेले बदल मोबाईल संगणक युट्युब टीव्ही देश-विदेशात घडणाऱ्या विविध घडामोडी मुळेपालक विद्यार्थी शिक्षक समाज यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांना योग्य मार्गदर्शन शिक्षकच करू शकतात.त्यामुळे फोर .जी होऊ द्या फाईव्ह जी होऊ द्या त्याच्यावरती एकच लस आहे ती गुरुजी विद्यार्थ्यांनी आई वडील शिक्षक यांना न विसरता अध्ययन करावे तरच उज्वल यशाचामार्ग मिळेल आपल्या व्याख्यानातून विविध कविता कथा लहान मोठे किस्से सांगत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत ..जुगाई .हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी केले . यावेळी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल ए जी . कांबळे यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी गोकुळच्या माजी संचालिका सौ .अनुराधा पाटील ताई माजी आमदार बाबासाहेब पाटील शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ . प्रीतम युवराज पाटील (वहिनी) येळवण जुगाईचे सरपंच सत्यवान खेतल ‘ उदय .साखर चे संचालक / कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम चव्हाण
देवस्थान समितीचे अध्यक्ष शरद कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वास गुरव संचालक अनिल भोसले चेअरमन रघुनाथ वायकूळ माजी सरपंच दशरथ घुरके धोंडीबा कुडाळकर माजी सैनिक सतीश वायकूळ पंचक्रोशीतील महिला बचत गटाच्या असंख्य महिला केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साखरे ‘ येळवण जुगाई ,, भंडारवाडी ,चिखलवाडी,गुरवाडी, मांजरे , पारिवने ,शेंबवणे,गळवडे , मोसम ,अनुस्कुरा ,भाततळी . भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरी आजी-माजी विद्यार्थी पालक माध्यमिक शिक्षक ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक विद्यार्थी वस्तीग्रहाचे अधीक्षक संजय लाड उपस्थित होते

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!