सामाजिक

आचार्य अत्रे पुरस्कारासाठी प्रस्ताव द्यावेत- शाहुवाडी तालुका पत्रकार संघ


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी आचार्य अत्रे पुरस्कार २०२२-२३ यासाठी जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यातील सभासद तसेच इतर इच्छूक पत्रकारांनी आपले प्रस्ताव दि.०९/०६ २०२२ पर्यंत शाहुवाडी पंचायत समिती कडे सादर करावेत. पुरस्कार निवडी चे काम जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. संदर्भीय माहिती शाहुवाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे यांनी दिली.


दरम्यान इच्छूक पत्रकारांनी समाजातील विकास, शासकीय योजना, तसेच जनजागृती संदर्भात आपण प्रसिद्ध करून आणलेल्या आपल्या दैनिकातील बातम्यांचे कात्रण व आवश्यक पुरावे या प्रस्तावासोबत जोडावे. जेणेकरून आपले मुल्यांकन करण्यास त्याची मदत होईल. कृपया हे प्रस्ताव ९ जून २०२२ पर्यंतच शाहुवाडी पंचायत समिती इथं जमा करावेत.


दरम्यान पुरस्काराचे स्वरूप तालुकास्तरावर रोख पाच हजार रुपये व प्रमाणपत्र असे राहणर आहे. तालुक्यातून फक्त एका पत्रकाराची निवड जिल्हा परिषद कडून करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशी माहिती शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी दिली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!