सामाजिक

आजपासून बांबवडे इथं मोफत मुळव्याध तपासणी शिबीर- भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल


बांबवडे : आजपासून भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्यावतीने मोफत मुळव्याध तपासणी शिबिरास सुरुवात होत आहे. हे शिबीर २३ मार्च पासून ३० मार्च २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले असून, नामांकित डॉक्टरांच्या कडून तपासणी करण्यात येईल. तसेच शिबिरात नोंदणी करणाऱ्यांचे केवळ ९९९९/-रुपयांमध्ये ऑपरेशन करण्यात येईल. अशी माहिती भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल चे डॉक्टर दिलखुष तांबोळी यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.


बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या गाडवे बिल्डींग मध्ये भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल आहे. इथं मुळव्याध-भगंदर तज्ञ डॉ. दिपक मगदूम MD. ( Ayu ) C.K.S. Consultant Ayurveda Proctologist या तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शिबिरामध्ये नोंद केलेल्या निवडक पेशंट साठी दुर्बिणीद्वारे मुळव्याध तपासणी मोफत केली जाईल. अशी माहिती देखील डॉ. तांबोळी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


मुळव्याध (Piles), भगंदर ( Fistula ). फिशर (Fissure ), यासह पायालोनीडल सायनस, आदी आजारांचे रुग्ण दर बुधवारी तपासण्यात येतील. अधिक माहितीसाठी, तसेच नोंदणीसाठी ७२७६००९०५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!