आज शाहुवाडी त दाखल झालेले नामनिर्देशन अर्ज
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून आज दि.१९/०१/२०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सौ राजकुवर रणवीरसिंग गायकवाड, तसेच पंचायत समिती साठी अभयसिंह बाळासो चौगुले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाकडून जिल्हापरिषद मतदारसंघासाठी श्री विष्णू रंगराव यादव,तर पंचायत समिती गणासाठी अमृता अविनाश पाटील, तसेच तानाजी सीताराम माने यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
सरूड जिल्हा परिषद मतदार संघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्री अमरसिंह हंबीरराव पाटील यांनी निवडणूक अर्ज दाखल केले”आहेत.

शित्तूर तर्फ वारुण या जिल्हापरिषद मतदारसंघासाठी सर्जेराव बंडू पाटील, तर पंचायत समिती गणासाठी अमरसिंह नारायण खोत यांनी नामनिर्देशन अर्ज जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दाखल केले आहेत.
तसेच भाजप पक्षाकडून जिल्हापरिषद मतदार संघासाठी रजनीताई विजय पाटील यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून लता विठ्ठल पोवार यांनी देखील नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
