” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आजही अनेक अवैध धंदे पडद्या आड सुरु आहेत. यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे, हि काळाची गरज ठरत आहे.

इथं काही किशोरवयीन तरुण ,आज xxxतून ” माल ” आला नाही. अशी चर्चा करताना आढळून आलेत. तसं पहायला गेलो तर हे काही नवीन नाही. येथील एका माळावर अनेक कंपू रात्री च्या दरम्यान झुरके मारताना आपल्याला आढळून येतील. एवढेच नव्हे तर पिशवी रस्त्याला सुद्धा पुढे गेल्यावर झाडांचा आडोसा घेवून , हे प्रकार घडत आहेत. यावर पोलिसांचा जरब आहे कि नाही, हे माहित नाही. परंतु त्यांच्या वरदहस्ताशिवाय हे घडतंय, हे पटत नाही.

हे कमी कि काय म्हणून आकडा सुद्धा मोटरसायकल वर फिरून घेतला जातो. याकडे सुद्धा लक्ष देणे, गरजेचे आहे.

केवळ पोलीस खात्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण यामध्ये आपली तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे निघालेय, याचे भान प्रत्येक पालकाने ठेवणे गरजेचे आहे.

झुरके मारणाऱ्या कंपूत आपली मुले असू नयेत, यासाठी पालकांनी जातीने लक्ष घालावे, अन्यथा येथील पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही.

पोलीस खात्याने सुद्धा याकडे जातीने लक्ष घालावे, हि तरुण पिढी आपल्या देशाचे भवितव्य आहे, कोण चिरीमिरी साठी याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर तो अलिखित राष्ट्रद्रोह ठरल्याशिवाय राहणार नाही.