…आणि डोळ्यांचे पारणे फिटले : श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सैन्य दलातील शौर्य पदक विजेते निवृत्त सैनिक श्री. नंदकुमार चावरे, तसेच सैन्य दलातील शौर्य पदक विजेते निवृत्त सैनिक प्रेमदास खरात यांच्या सहित शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री अमित पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील या उपस्थित होत्या. तसेच , संस्थेच्या उपाध्यक्षा सौ विनिता जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडले. यावेळी अनेक गाणी, नृत्य, मल्लखांब विद्यार्थ्यांनी सादर केलीत.
यावेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम आणि निवेदन इंग्रजीत केले. यामुळे पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ग्रामीण भागातील विद्यार्थी फाड फाड इंग्रजीत बोलताना पाहून उपस्थितांचे मन भरून आले. कार्यक्रमाला आलेल्या पालकांनी यामधून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शिक्षणाचे तीन तेरा वाजत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असताना, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाने शाहुवाडी तालुक्यातील जनतेला या माध्यमातून एक पर्याय दिला आहे. असेच यावरून दिसून येत आहे.
डोणोली येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने शैक्षणिक कामामध्ये गुणवत्ता याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. हे यावरून दिसून येते. याचा परिणाम स्वरूप या कार्यक्रमात विद्यार्थी इंग्रजी मध्ये बोलताना पाहून त्यांच्या पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य सचिन जद सर यांनी शाळेच्या कारकीर्दीबाबत अहवाल वाचन केले. यामध्ये या शाळेचा दहावी व बारावी चा निकाल १०० % लागत आहे. तसेच शाळेचे उत्तीर्ण होणारे ८५ % विद्यार्थी ८५ % पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होत आहेत. यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला आहे, हे सुद्धा यातून दिसून येत आहे.. दरम्यान संस्थेचे सचिव डॉ. श्री जयंत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी शाळेचे तसेच कॉलेज च्या सर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, नृत्य दिग्ददर्शक अक्षय हांडे, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.