…आणि तालुक्याच्या उत्तर भागाचा काळंच संपला.: रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
शित्तूर तर्फ वारुण (शिवाजीराव नांगरे ) : एकेकाळी डोलीतून रुग्णांची ने-आण करायला लागणाऱ्या शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागाचा जणू काळंच संपला. शित्तूर तर्फ वारुण प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिकेचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला. हा लोकार्पण सोहळा माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर व कोल्हापूर जिल्हा परिषद चे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांच्या हस्ते संपन्न झाला.

एक काळ असा होता कि, या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी शिक्षा म्हणून पाठवले जात असंत. ते काही दिवसंच काढायचे आणि पुन्हा शहरी वस्तीकडे आपली बदली करून घ्यायचे. त्यामुळे इथल्या डोंगर कपारीत राहणाऱ्या धनगर बांधवांना, तसेच सामान्य जनतेला आरोग्य सुविधेस मुकावे लागंत असे. आमच्या गरोदर भगिनींची तर त्रेधातिरपीट उडायची. अशा वाईट अवस्थेत इथल्या लोकांनी दिवस काढले आहेत, हे बऱ्याच जणांना माहित होते. परंतु त्यावर काही उपाय निघत नव्हता. आज ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने १४ व्या वित्त आयोगामधून , जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून शित्तूर-वारुण प्राथमिक आरोग्य केंद्रास अद्ययावत रुग्णवाहिका देण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर.निरंकारी ,व डॉ पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.


यावेळी शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती सौ.सुनिता पारळे, उपसभापती विजयराव खोत, पंचायत समिती चे माजी उपसभापती दिलीप पाटील, पंचायत समिती चे माजी सदस्य जालिंदर पाटील, सरपंच भीमराव पाटील, रवी शेडगे, मारुती वडाम, ग्रामसेवक पी.एन.पाटील, आदी पदाधिकाऱ्यांसह शंकर देसाई, बाळासाहेब पाटील, तात्यासो पाटील, राजाराम पाटील, दीपक भोसले, प्रशांत गुरव, रामचंद्र नांगरे, सदाशिव नांगरे, समिंदर जाधव, डॉ. राउत, भिकू पाटील, वसंत पाटील, चंद्रकांत राउत, रामचंद्र राउत, सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य सगन डफडे, नामदेव ढवळे, मर्यादा फोंडे, जयवंत फोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.