…आणि रणवीर सरकार केडीसी बँकेत संचालक झाले
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड दादा यांचे चिरंजीव आणि उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड विजयी झाले आहेत. रणवीरसिंग गायकवाड सरकार यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.



जिल्हा मध्यवर्ती बँकेत चुरशीचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न, मतमोजणी च्या पहिल्याच फेरीत निकालात निघाला. रणवीरसिंग गायकवाड यांनी सेवा संस्था गटातून हि निवडणूक लढली होती. या गटात एकूण ९९ मतदान होते. यापैकी रणवीरसिंग गायकवाड यांना ६६ मते मिळाली आहेत. त्यांच्या विजयाने शाहुवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस ला पुन्हा उभारी मिळाली आहे. बांबवडे पंचक्रोशीतून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. बांबवडे च्या चौकात डीजे लावून, गुलालाची उधळण सुरु झाली आहे.



गेली पाच वर्षे मानसिंगराव गायकवाड दादा यांना सतावणारे शल्य आज दूर झाले असून, विजयाची सुरुवात झाली आहे. यापुढे देखील जिल्हापरिषद, पंचायत समिती च्या निवडणुका जवळ आल्या असून, त्या विजयाची हि नांदी आहे. असे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे.