आणि शब्द हि, नि:शब्द झाले ….
बांबवडे : माझे जीवा-भावाचे सोबती सोडून जात आहेत. याचे मला खूप दु:ख होत आहे. अशा आशयाचे वक्तव्य माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांनी आपला शोक व्यक्त करताना केले. यावेळी त्यांना गहिवरून आले. आणि शब्द नि:शब्द झाले. असे भावूक होण्याची दादांची हि पहिलीच एल असावी.

शाहुवाडी चे माजी सभापती स्व.जयसिंगराव पाटील भाडळेकर यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांचा रक्षाविसर्जनाचा विधी आज दि.२० जून रोजी संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

त्यांनी आपला शोक व्यक्त करताना, अनेक मान्यवरांनी वक्तव्ये केली.

यातील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांचं वक्तव्य खूपच हळवं आणि भावनिक होतं. त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कारण भाडळेकर सभापती व दादा यांनी अनेक वर्षे एकत्र राजकारण केलं होतं. त्यामुळे त्यांची सर्वाधिक जवळीक दादांसोबत होती. त्यामुळे सरूडकर दादांना सर्वाधिक वाईट वाटलं असावं. यातून त्यांचे राजकारणापलीकडे असलेले मैत्रीचे धागे मात्र निदर्शनास आले.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, यांच्यासह शाहुवाडी , पन्हाळा व शिराळा तालुक्यातील अनेक राजकारण्यांनी आपल्या जुन्या मित्राला श्रद्धांजली वाहिली.