“आण्णाभाऊ झाले साहित्य सम्राट ” गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध
बांबवडे : साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा अजित साठे लिखित
“आण्णाभाऊ झाले साहित्य सम्राट ” गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. १ ऑगस्ट रोजी येणाऱ्या जयंती निमित्त वाटेगाव इथं त्याचे प्रदर्शन होणार आहे.

Aj Films All Time या Youtyub Channel वर प्रक्षेपण करण्यात आले, तर ” आण्णाभाऊ झाले साहित्य सम्राट ” या मराठी अल्बम गीताला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी गीतकार अजित साठे यांनी गायक शीतल कोळी व देव स्टुडीओ चे मालक शुभम जाधव व त्यांचे सहकारी,तसेच त्यांचे सहकारी सावे येथील संजय धोंगडे यांचे देखील आभार व्यक्त केले.