आनंदराव केसरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर -सरांचे अभिनंदन
बांबवडे :
शाहुवाडी तालुक्यातील दैनिक पुढारी चे प्रतिनिधी श्री आनंदराव केसरे यांना आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त केसरे सर यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज आणि शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने हार्दिक अभिनंदन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील उत्कृष्ठ पत्रकारांची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. यंदाचा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार शाहुवाडी तालुक्यातून श्री केसरे सर यांना मुल्यांकनानुसार प्राप्त झाला आहे. पुनश्च श्री आनंदराव केसरे यांचे हार्दिक अभिनंदन.