” आपला माणूंस ” ठरलेल्या विजयराव बोरगे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पिशवी जि.प. मतदारसंघाचे संदस्य विजयराव बोरगे यांचा वाढदिवस डोंगरासारख्या शुभेच्छांनी संपन्न झाला.
आपला माणूस म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण तालुक्याला झाली. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव न झाला, तरच नवल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व उदय साखर चे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड दादा यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाचे वतीने वारणा दुध संघाचे ज्येष्ठ संचालक एच.आर. जाधव, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, शंकर पाटील , व मान्यवर आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान वेळेअभावी प्रत्यक्ष भेट न देणाऱ्या मंडळींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार डॉ.विनय कोरे, कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजीव आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, विश्वास शिक्षण समूहाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, जि.प.सदस्य राहुल पाटील, जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेते विजय भोजे, करवीर पंचायत समिती चे सभापती अंकुश झांबरे, जि.प.स. मनोज फराकटे, पोलीस उपाधीक्षक निवास साळुंखे, गोकुळ चे संचालक युवराज पाटील बापू आदी मान्यवरांनी ” आपला माणूंस ” ठरलेल्या विजयराव बोरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.