आपल्या मातीवर अव्याहतपणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे ” एमजी पाटील ” सर : त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बांबवडे : वाडीचरण तालुका शाहुवाडी येथील निगर्वी व्यक्तिमत्व, आणि आमचे मित्र असलेले मानसिंगराव पाटील सर यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

मानसिंगराव पाटील म्हणजे आमचे एमजी पाटील सर. नेहमी कोणालाही मदत करण्यासाठी सतत तयार असणारे, हे व्यक्तिमत्व प्रत्येकाला जवळचं वाटतं. सरांविषयी प्रत्येकाच्या मनात सद्भावना असलेली पाहायला मिळते. सर म्हणजे एक राणी माशी असून, त्यांच्याभोवती अनेक सहकारी आपोआप गोळा होतात. शिक्षक असूनही, त्यांचे शेतीवर अव्याहतपणे प्रेम आहे. जो माणूस मातीला धरून असतो, तो आभाळाला देखील स्पर्श करू शकतो. असे हे व्यक्तिमत्व निश्चितच उदंड आयुष्याचे ठरावे.

वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने सरांना पुस्तके देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम , प्रमुख मार्गदर्शक भालचंद्र शेटे सर, वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर सर, जालिंदर शेटे, पावन चिकुर्डेकर सर, बच्चे दादा अशा अनेक मान्यवरांनी एमजी पाटील सरांना शुभेच्छा दिल्या.