आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही -श्री ओंकार चौगुले
कोडोली प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या वतीने कोडोली पश्चिम जिल्हापरिषद व पंचायत समिती गण लढवण्यात येत आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांनी कंबर कसली असून प्रस्थापितांच्या म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जावून, नव्या विचारसरणीचे बीजारोपण हि तरुणाई करीत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी उभी केलेली तरुणाई ची फळी गावा गावात शिवसेनेचा प्रचार करीत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना युवकांना नवे विचार व नवी दिशा देण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक असून, मला एकदा संधी द्या, मी आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. तसेच साहेबांच्या माध्यमातून शिक्षण व शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, हे त्यांचे व्हिजन असल्याचे जिल्हा परिषद चे उमेदवार श्री ओंकार महादेव चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
कोडोली जिल्हापरिषद मतदारसंघासाठी शिवसेनेच्यावतीने श्री ओंकार महादेव चौगुले या तरुणाने आपली शिवसेनेची ताकद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत विनोद रमेश महापुरे या नवख्या तरुणाला कोडोली पश्चिम पंचायत समिती गणासाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
एका सर्व सामान्य कुटुंबातील तरुणाला उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात सामान्य जनतेत चैतन्याचे वारे पसरू लागले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सामान्य जनता विरुद्ध रुजलेले मुत्सद्दी राजकारण असा सामना रंगेल, असे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे.
दरम्यान आपल्या या तरुण उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी या निवडणुकीत रात्रीचा दिवस करतील, यात शंका नाही. यावेळी शिवसेनेचे येथील विभाग प्रमुख सुनील पाटील, शैलेश प्रतापराव पिसाळ शहरप्रमुख यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
