राजकीयसामाजिक

आम्ही बँकेचे मालक नसून ,विश्वस्त म्हणून कारभार करतो- नाम. हसन मुश्रीफ

बांबवडे : आपण जिल्हा बँकेचे विश्वस्त आहोत, मालक नाही, अशी भावना प्रत्येक संचालकांनी आजवर ठेवली आहे. म्हणून गेल्या साडेसहा वर्षात बँकेची कोणतीही सुविधा केवळ चहा शिवाय घेतली नाही, म्हणूनच आज बँक १८ कोटी आयकर भरणारी राज्यात पहिली बँक आहे. हि शेतकऱ्यांची बँक असून, त्यांचे आर्थिकमान उंचावण्याचा प्रयत्न करू या, असे मत राज्याचे कामगार मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठराव धारकांचा मेळावा बांबवडे येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.


यावेळी नाम. मुश्रीफ पुढे म्हणाले कि, बँकेने आपली आर्थिक परिस्थिती गेल्या पाच वर्षात सुधारली असून, सुमारे १५० कोटी चा नफा चालू कारकिर्दीत बँकेला झाला आहे. बँक तोट्यातून बाहे काढून नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळींनी अनेक नवे पायंडे घालून घेतले. दरम्यान नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे विधिमंडळात ठरले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच सभासदांना एकरी पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद देखील येत्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.


यावेळी शाहुवाडी तालुक्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले कि, या व्यासपीठावर तालुक्यातील दोन्ही टोके एकत्र आल्याने समाधान वाटले. कारण या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, व संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर उपस्थित होते. दरम्यान या निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड आणि सर्जेराव पाटील पेरीडकर हे सेवा संस्था गटातून एकमेकांसमोर आमने-सामने उभे ठाकले आहेत. असे असतानाही मानसिंग दादा व सर्जेराव एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले,या अनुषंगाने श्री मुश्रीफ म्हणाले. दरम्यान शिवसेनेला दोन जागा व एक जागा स्वीकृत म्हणून देण्याचे आम्ही सांगितले होते, तरी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली .


यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शाहुवाडी चे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले कि, नाम. मुश्रीफ यांच्यामुळे बँकेला १५० कोटींचा नफा झाला आहे. जिल्हा बँक हि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पुरवठा करणारी एकमेव बँक असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या बँकेची उन्नती होणे, हि काळाची गरज आहे.या बँकेवर सभासदांनी ६० हजार कोटींच्या ठेवी ठेवून मोठा विश्वास दर्शवला आहे. तेंव्हा या बँकेचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणे, हि काळाची गरज आहे. राजा आणि ऋषी यांच्या एकत्रित गुणांच्या संगमाने ज्यांना उपाधी लाभली अशा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा तालुका आजमात्र आर्थिकतेच्या बाबतीत मागे आहे. यासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ ,तसेच एकरी पाच लाख बिनव्याजी कर्ज पुरवठा करून तालुक्यात स्वयंरोजगार उभा करणे , हा त्यामागील हेतू आहे. या माध्यमातून तालुक्यातील आर्थिक असमानता मिटविण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
यावेळी मानसिंगराव गायकवाड म्हणाले कि, मुश्रीफ साहेबांमुळे आपला कारखाना अडचणीतून बाहेर निघाला आहे. यासाठी शेतकरी विकास आघाडीच्या नऊ उमेदवारांना एकटाक मतदान माझ्या कार्यकर्त्यांकडून होणार आहे. तसेच बरेचसे गायकवाड एकाच व्यासपीठावर गोळा झालेले पाहून बरे वाटले. तसेच मुश्रीफ साहेबांनी तालुक्यातील दोन टोके एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मुश्रीफ साहेबांचा आदेश पाळणार असल्याचेही यावेळी मानसिंग दादांनी सांगितले.
यावेळी सर्जेराव पाटील पेरीडकर म्हणाले कि, ३०० कोटी तोट्यात असलेली बँक , तोट्यातून बाहेर काढून १५० कोटी नफ्यात आणणे हे जिकरीचे काम आहे, ते या आघाडी ने यशस्वीरीत्या पूर्ण केले. दरम्यान याठिकाणी आव्हाने मोठी आहेत, पण आपण ती पूर्ण करू. तालुक्यातील अनेक बंद पडलेल्या सेवा संस्थांचे आम्ही पुनर्जीवन केले आहे. मतदार सुज्ञ आहेत, त्यामुळे आपला विजय निश्चित होणार , यात शंका नाही.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती पंडितराव नलवडे यांनी केले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे, निवेदिता माने वहिनी, कर्णसिंह गायकवाड, पंडितराव शेळके आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!