” आम्ही लस घेतलेय, तुम्हीही घ्या ” – आरोग्य सभापती हंबीरराव पाटील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आरोग्यवर्धिनी मध्ये ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण आजपासून सुरु झाले आहे. यावेळी जेष्ठ नेते मा. आम. बाबासाहेब पाटील सरुडकर , तसेच गोकुळ च्या संचालिका अनुराधाताई पाटील यांनी लस घेतली. याचबरोबर बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , जि.प. सदस्य विजयराव बोरगे पैलवान, साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंदराव पवार, विक्रम पाटील यांनीदेखील लसीकरणाचा पहिला डोस घेतला.

यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा लसीकरणाच्या या टप्प्याचा लाभ घेतला.

या वेळी बोलताना सभापती हंबीरराव पाटील म्हणाले कि, महाराष्ट्रात कोरोना पुन्हा थैमान घालण्याच्या तयारीत असताना , कोल्हापूर जिल्ह्यात या कोरोना ला आवर घालण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. शासनाने लसीकरण सुरु केले असून ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पहिला टप्पा आहे. हि लस आम्ही घेतली आहे, आपण हि घ्या. तसेच याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होवून लसीकरण यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा सभापती हंबीरराव पाटील यांनी केले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच आर. निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिपाली जद, डॉ. बालाजी पाटील, आरोग्य सहाय्यक सुभाष यादव, डी. ए. लोहार, के.बी. मोहिते, आरोग्य सहाय्यिका एस.व्ही. माने, एस. एस. गिरी, आरोग्यसेवक के. पी. दुर्गे, बी. ए. जाधव, डाटा ऑपरेटर अभिजित यादव, क्लार्क चव्हाण, डॉ. स्वप्नाली पाटील सी.एच.ओ. यांनी हि मोहीम यशस्वी रित्या सांभाळली.