‘ आरव केसरे ‘ चा संशयास्पद रीत्त्या सापडलेल्या मृतदेहामुळे कापशी गावात संतापाची लाट
बांबवडे (दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव राकेश केसरे याचा मृतदेह संशयास्पद रित्या त्यांच्याच घराच्या मागील बाजूस आज दि.५ ऑक्टोबर रोजी पहाटे आढळून आला. यावेळी त्याच्या अंगावर हळदी कुंकू ,तसेच गुलाल टाकला असल्याचे समजत आहे. यावरून हि घटना नरबळी किंवा गुप्त धन मिळविण्याच्या लोभापायी घडली असावी, अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान राकेश सर्जेराव केसरे यांना दोन मुलगे आहेत. त्यापैकी रुद्र हा ८ वर्षांचा, तर आरव हा ६ वर्षांचा मुलगा होता.
दरम्यान काल दिवसभर पोलीस कर्मचारी राकेश चा शोध घेत होते. या दरम्यान त्यांनी परिसरातील विहिरी, तसेच गोबर गॅस चे खड्डे, तसेच सर्वच संशयित ठिकाणांची झाडाझडती पोलिसांनी घेतली. तरीदेखील आरव कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे आज सकाळी मिळालेला आरव चा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागील बाजूस आढळून आल्याने पोलीस यंत्रणेची चक्रे त्यांच्याच कुटुंबाकडे वळतील,अशी ग्रामस्थांतून चर्चा आहे.
दरम्यान ग्रामस्थांकडून सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून, अपराधी व्यक्तींना फाशी देण्यात यावी,अशी मागणी देखील करण्यात येत आहे.