राजकीयसामाजिक

आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते “ पीपीई ” कीट चे वाटप

शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता खाजगी डॉक्टरांनी प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविताच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई कीट चे वाटप जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते शाहुवाडी पंचायत समितीच्या प्रांगणात करण्यात आले.

शाहुवाडी तालुक्यात वैद्यकीय सेवा सुरळीत होण्यासाठी आरोग्य विभागाकडे डॉक्टर संख्या अपुरी असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद खाजगी डॉक्टर मंडळींनी दिला. या सर्व डॉक्टरांनी पाठींबा दिल्याने कोव्हीड सेंटर त्याचबरोबर अलगीकरण केलेल्या ठिकाणी सेवा देण्यासाठी तयारी दर्शविली,परंतु त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहातच आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी त्वरित लक्ष घालून या डॉक्टरांना या पीपीई कीट चे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुक्यातील खाजगी डॉक्टर उपस्थित होते.

तसेच हे वाटप शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत, सदस्या डॉ.स्नेह जाधव, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.आर. निरंकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!