इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा मलकापुरात ” रास्ता रोको “
शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ) : केंद्र शासनाने गॅस , पेट्रोल सह केलेली इंधन दरवाढ सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारी आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्कील झालं आहे. या वाढवलेल्या महागाईची किंमत भाजप ला मोजावी लागणार आहे. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शाहुवाडी शिवसेनेच्या वतीने मलकापूर येथील विठ्ठल मंदिर जवळ महामार्गावर ” रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सेनेचे नामदेव गिरी म्हणाले कि, केंद्र शासन महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेची लुट करीत आहे. एकीकडे ऐतिहासिक सिनेमा ” पावनखिंड ” टॅक्स फ्री करण्याची मागणी होत असताना, ती न करता ‘ काश्मीर फाईल्स ‘ टॅक्स फ्री करण्याची मागणी करीत आहेत. या सगळ्याची किंमत लवकरच केंद्र शासनाला भोगावी लागणार आहे, यात शंका नाही.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख दत्ता पोवार म्हणाले कि, केंद्र शासन जनतेला पोकळ, आणि फसवी आश्वासने देवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवण्यात भर टाकीत आहेत. यामुळे जनतेला जगणं मुश्कील झालं आहे. तर दुसरीकडे ईडी सारख्या तपास यंत्रणांचे भीती दाखवून, दिखावूपणा करीत आहेत. या सगळ्याची किंमत भाजपा ला मोजावी लागणार आहे.

यावेळी योगेश कुलकर्णी, दिनकर लोहार महिला शिवसैनिक शहजाद आत्तार आदींनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी राहुल पवार, सुभाष कोळेकर, बाळकृष्ण सपाटे, सचिन मूडशिंगकर , अनिल पाटील, निवास कदम, विजय लाटकर, अक्षय पाटील, पांडुरंग रवंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.