“ इतना सन्नाटा क्यू है,भाई? ” : बांबवडे परिसर
बांबवडे : दि.२६ एप्रिल रोजी बांबवडे इथं सापडलेल्या इसमाची तपासणी केली असता, तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समजताच, बांबवडे आणि पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बांबवडे इथं वर्दळीचे वातावरण वाढल्यामुळे, बांबवडे कोरोना समितीने बांबवडे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे पुन्हा ठरवल्याने बांबवडे पूर्णत: बंद केले आहे. यामुळे रस्त्यावर पूर्णत: शांतता पसरली आहे.
जीवनावश्यक वस्तू किंवा किराणा दुकाने पूर्णपणे बंद केल्याने शंभर टक्के बांबवडे बंद केले गेले आहे. बांबवडे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना स्पीकर वरून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.
बांबवडे येथील शंभर टक्के बंद अनुभवल्यानंतर “ इतना सन्नाटा क्यू है,भाई? ” ह्या वाक्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.