उचत इथं आणखी एक तरुण कोरोनाबाधित:शाहुवाडी तालुक्यात ३ कोरोनाबाधित
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील उचत इथं आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाला आहे. यामुळे शाहुवाडी तालुका हा हॉटस्पॉट होतोय का? असा प्रश्न आता सामान्य जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
तालुक्यातील उचत इथं पहिला कोरोना बाधित रुग्ण जेंव्हा निष्पन्न झाला. तेंव्हाच तालुक्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली. या अगोदर सुद्धा आरोग्य, पोलीस, आणि प्रशासन यंत्रणा आपलं कर्तव्य बजावत आहे. परंतु उचत येथील तरुण सापडल्यानंतर त्याची आई सुद्धा कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.पण त्यानंतर आज त्याचा पुतण्या २४ वर्षीय असून तोही आज कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामुळे आज पर्यंत शाहुवाडी तालुक्यात एकूण तीन कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.