राजकीयसामाजिक

उचत मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यास शिक्षिकेकडून अमानुष मारहाण : निलंबनाची “भीमशक्ती” कडून मागणी


बांबवडे प्रतिनिधी : उचत तालुका शाहुवाडी येथील जिल्हापरिषद च्या प्राथमिक विद्यामंदिर उचत मधील शिक्षिकेने पहिलीच्या विद्यार्थ्यास अमानुष पणे मारले आहे. सदर शिक्षिकेस तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हापरिषद च्या शिक्षण विभागास
“भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या ” वतीने देण्यात आले आहे.


शाहुवाडी तालुक्यातील उचत येथील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये पहिली च्या इयत्तेत आरुष अरविंद कांबळे या विद्यार्थ्यास येथील शिक्षिका हेमलता कुंभार यांनी दोन दिवसांपूर्वी मारहाण केली होती. आणि सदर घटना घरी सांगितल्यास उद्या पुन्हा मारणार, अशी धमकी या शिक्षिकेने विद्यार्थ्यास दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्याने सदर प्रकार घरी सांगितला नव्हता. परंतु त्याच्या आईने त्याला आंघोळ घालताना, त्याच्या पाठीवर उठलेले वळ त्यांनी पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.


याबाबत भीमशक्ती संघटनेचे आनंदराव कामत यांनी शिक्षिका हेमलता कुंभार यांच्याकडे सदर घटनेबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवी ची उत्तरे दिली. त्यानंतर कसून विचारले असता, सदर घटनेची कबुली दिली. सदरबाबत तक्रार करू नका, अशी विनंती देखील केली.


शासकीय नियमानुसार ज्या गावात शिक्षक कार्यरत आहे, त्याच गावात रहावे, असा नियम असताना सुद्धा, सदर शिक्षिका करंजोशी इथं मुक्कामी असतात. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ त्रास देतात, अशा वल्गना सुद्धा केल्या गेल्या. अशी माहिती आनंदराव यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


सदर घटनेबाबत बोलताना आनंदराव कामत म्हणाले कि, मुळात ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या कमी आहे. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी असून, हा या समाजावर होणारा अन्याय आहे. याबाबत सदर शिक्षिकेस तत्काळ निलंबित न केल्यास भीमशक्ती संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल.असेही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!