उदय सह.साखर कारखाना सोनवडे-बांबवडे च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने रास्ता रोको
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं अथणी शुगर्स युनिट नं.२ तसेच उदय सह.साखर कारखाना सोनवडे-बांबवडे च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आज पहाटे पासून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यामुळे कारखान्याकडे जाणारा रस्ता जम झाला आहे.
हे आंदोलन कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा. यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून या मुद्द्यांवर कारखाना व्यवस्थापन समिती आणि कर्मचारी यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. परंतु कारखाना प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. आणि केवळ चाल-ढकल सुरु आहे. यावर एकमेव पर्याय म्हणजे काम थांबवणे . असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जोवर वेतन आयोगाबाबत कार्यवाही होत नाही, तोवर हा रास्ता रोको आंदोलन सुरु राहणार आहे. असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या या रस्ता रोको मुळे ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्यावर थांबून आहेत. यामुळे ऊस वळला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान दुपारी १ वाजेपर्यंत कारखाना प्रशासनाकडून कोणताही निरोप आलेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप वाढू लागला आहे.
