उदय साखर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणार – श्री मानसिंगराव गायकवाड
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील एकमेव असलेल्या उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना बांबवडे-सोनवडे यांच्यावतीने ऑक्सिजन प्लांट निर्मितीचा निर्णय घेण्यात येत आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

सध्या तालुक्यातील अनेक तरुण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुण्यासारख्या शहरात वास्तव्यास असतात. परंतु त्यांची आपल्या जन्मभूमीशी नाळ कायम राहिली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात कोरोना चा शिरकाव जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. अशावेळी जनतेला ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन निर्मिती गरजेची ठरत आहे. म्हणूनच ऑक्सिजन प्लांट निर्मिती चा निर्णय घेण्यात येत आहे. असेही श्री मानसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.