उदय साखर चा रस्ता बंद : मोहरी वाहून गेली
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह.साखर कारखान्याला जाणारा रस्ता बंद झला असून ,नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.

दि. २२ जुलै २०२१ रोजी सुरु झालेल्या पावसामुळे बांबवडे चा पाझर तलाव निर्मिती पासून आज पर्यंत पहिल्यांदाच भरून उलटू लागला आहे. तलाव पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने सांडव्यातून पाणी जावून सुद्धा पाणी धरणावरून उलटू लागले आहे. तसेच कारखान्याला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे.

दरम्यान धरणाच्या अलीकडे असलेली पाण्याची मोहरी पावसाच्या माऱ्यामुळे वाहून गेली आहे. तेंव्हा कारखान्याकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.