“उदय साखर” च्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप :कार्य.संचालक भगवान पाटील
बांबवडे : उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना आणि रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती यांच्यावतीने शाहुवाडी तालुक्यातील अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शाहुवाडी तालुक्यातील शाहुवाडी, सोंडोली, विरळे, थावडे, रेठरे, येळाणे, गोंडोली आदी गावात या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी उदय साखर चे कार्यकारी संचालक भगवान पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष उत्तम मोरे, नायब तहसीलदार कोळी, पुरवठा अधिकारी शेळके, शरद निकम, आदी मान्यवरांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
यावेळी येळाणे चे सरपंच संजय पाटील, प्रकाश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शाहुवाडी तालुका युवक उपाध्यक्ष सुरज सावंत, सोंडोली चे माजी सरपंच भीमराव पाटील, जोशी काका, अनिल पाटील, सुरज बंडगर आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.