उदय साखर पूर्ववत सुरु – व्यवस्थापन कर्मचारी सभासदांनी कारखाना वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे- श्री रणवीरसिंग गायकवाड सरकार
बांबवडे : उदय सह.साखर कारखाना बांबवडे – सोनवडे तथा अथणी शुगर्स युनिट २ चा संप उदय व अथणी शुगर्स चे व्यवस्थापन व कारखाना कर्मचारी यांच्यात योग्य तोडगा निघाला असून, कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे आजपासून पुन्हा एकदा कारखान्याची चक्रे फिरू लागणार आहेत. संप मिटल्याने कर्मचारी वर्ग तसेच प्रशासन आणि चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड दादा तसेच संचालक रणवीरसिंग गायकवाड सरकार यांनी देखील समाधान व्यक्त केले.

यावेळी कर्मचारी वर्गाचे प्रतिनिधी दीपक निकम , जमीनधारक वर्गाचे प्रतिनिधी भगवान निकम, राजाराम पाटील,बाबासाहेब निकम आदी शेतकरी बांधव यांनी देखील समाधान व्यक्त केले.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या कारखाना दोन्ही प्रशासनाने मान्य केल्या. यामुळे कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला.
याबाबत संचालक श्री रणवीरसिंग सरकार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत. परंतु त्यासाठी कोणीही कारखाना वेठीस धरणे, हि बाब चुकीची आहे. यासाठी भविष्यात कर्मचारी वर्ग, सभासद वर्ग, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासह कारखाना हि आपल्या रोजगाराची जननी मानून कार्यरत राहावे, भविष्यात असा कटू प्रसंग उद्भवू नये, यासाठी दक्ष राहावे.आणि कारखाना कशा रीतीने मोठा होईल, यासाठी प्रयत्नशील राहावे.
याप्रसंगी अथणी प्रशासनाचे कार्यकारी संचालक श्री श्रीनिवास पाटील, जनरल मॅनेजर श्री रवींद्र देशमुख यांनी कर्मचारी वर्गाशी हितगुज साधले.
यावेळी दीपक निकम तात्या यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितले कि, प्रशासनाने आपल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे कारखाना पूर्ववत सुरु झाला आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या विभागातील, गटातील, ग्रुप मधील वाहने भरून कारखान्याकडे पाठविण्यास सुरुवात करावी. कारखाना आपली कर्मभूमी आहे. तिच्याशी आपण एकनिष्ठ राहून कार्यतत्परता दाखवू या. चेअरमन श्री मानसिंग दादा, संचालक श्री रणवीर सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत आलो असून, भविष्यातही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू.असेही श्री दीपक निकम यांनी सांगितले. यावेळी राजू निकम , संजय निकम, अरुण निकम,दिलीप बंडगर, प्रभाकर बच्चे, संदीप निकम, सतीश निकम यांसह अनेक कर्मचारी देखील उपस्थित होते. दरम्यान कर्मचारी वर्गातून देखील दोन्ही प्रशासनाचे आभार मानले.

