उदय साखर वर सुरक्षा सप्ताह निमित रिफ्लेक्टर चे वाटप
बांबवडे : उदयसिंगराव गायकवाड सह.साखर कारखाना बांबवडे कार्यस्थळावर वाहतूक महामार्ग पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत शेंडगे यांनी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्ताने अनेक नियमांची माहिती आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून करून दिली. तसेच रिफ्लेक्टर चे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी त्यांनी हेल्मेट चे महत्व, रिफ्लेक्टर (प्रतिक्षेपक) चे महत्व व वाहतूक नियमांची किती गरज आहे, याची माहिती दिली.
यावेळी ट्रॅक्टर चे सर्व चालक, कामगार उपस्थित होते. यावेळी स्वप्नील पोवार पोलीस उपनिरीक्षक, सुभाष मोरे, दीपक पाटील, सुर्यकांत कुंभार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अथणी शुगर्स चे इस्माईल मुलाणी, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, शेती अधिकारी विनोद पाटील, केनयार्ड सुपरवायझर विजय पाटील, अरुण निकम, व केनयार्ड चे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी श्री आनंदा पोवार, दीपक निकम, संतोष निकम, अजित लोहार, बाबा शेळके उपस्थित होते.