उदे गं अंबे उदे .. : आजपासून शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ
बांबवडे : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. कोरोना संक्रमण काळामुळे सगळी मंदिरे बंद आहेत. परंतु जनसामान्यांचा श्रद्धा भाव अजूनही जागा आहे. आज घटस्थापना करून या उत्सवाला सुरुवात होते आहे. कोल्हापूर ची अंबाबाई ची शोडपचारे पूजा करून घटस्थापना होत आहे.


ज्याप्रमाणे महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे या कोरोना च्या दुष्ट चक्रातून आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी जगदंबा निश्चितच धावून येईल. आज मंदिरात जावून जरी दर्शन घेता येत नसले, तरी घरी राहून भक्तिभावाने या आदिशक्ती ची पूजा केल्यास, हि त्रीभूवानाची आई आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी निश्चितच धावून येईल.

उदे गं अंबे उदे ..