उदे गं आई उदे…: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा जागर सुरु
बांबवडे : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. आदिशक्ती चा जागर आजपासून सुरु होत असून वातावरण भक्तिपूर्ण झाले आहे. आदिशक्ती म्हणजे स्त्री शक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे. ती कोणत्याही रुपात असो.

याच स्त्री शक्ती ने एकेकाळी जिजाऊंच्या रूपाने अवघी मुघलशाही पालथी घालणारा शिवांश छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने निर्माण केला. तीही स्त्री शक्ती म्हणजेच आदिशक्ती च होती. याच आदिशक्ती ने महाराष्ट्र मुघली सलतनीच्या जोखडातून बाहेर काढला.

अशा अनेक आदिशक्ती आहेत, म्हणूनच हे जग तरलं आहे. त्यामुळेच आदिशाक्तीला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने शतशः नमन. आणि आपल्या सर्वांना शारदीय नवरात्रोस्त्वाच्या लाख लाख शुभेच्छा.